नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर शनिवारी सायंकाळी झालेल्या कोल्डप्लेच्या कॉन्सर्टमध्ये हजारो चाहते मंत्रमुग्ध झाले होते. ख्रिस मार्टिन यांच्या नेतृत्त्वाखाली ब्रिटिश रॉक बँडने सादर केलेल्या कार्यक्रमात चाहत्यांनी जल्लोष केला. मात्र, अनेक चाहत्यांनी एक अविस्मरणीय संध्याकाळ अनुभवली असतानाच एका चाहतीचे कॉन्सर्टचे तिकीट हरवल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. कॉन्सर्टची आतुरतेने वाट पाहणाऱ्या प्राची सिंगया फॅनने पोस्टमध्ये तिने स्पष्ट केले की, "आम्हाला कोल्डप्लेची दोन तिकिटे मिळाली
...