जंगलाच्या राजा सिंहाच्या डरकाळ्यामुळे जंगलातील सर्व प्राणी थरथरू लागतात, सिंहाची भीती अशी असते की, त्याच्या समोर येण्याची हिम्मत होत नाही. जंगलाच्या राजाची दहशत आता फक्त जंगलापुरतीच मर्यादित राहिली नाही, कारण आता तो लोकांच्या वस्तीतही जाऊ लागला आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक सिंह रात्रीच्या अंधारात घराच्या पायऱ्यांवर चालताना दिसत आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर खळबळ माजवत आहे.
...