सोशल मीडियावर एक धोकादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये स्कूटरवर स्वार झालेले दोन तरुण व्यस्त रस्त्यावर फटाके फेकताना दिसत आहेत. या असामान्य आणि निष्काळजी कृत्यामुळे स्थानिक पोलिसांनी दोन्ही तरुणांना अटक केली असून या कृत्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत. बंगळुरूमधील हेन्नूर येथील मुख्य रस्त्यावर ही घटना घडली, जिथे १९ वर्षीय आदित्य एस. आणि त्याचा मित्र 18 वर्षीय अक्षय कुमारने स्कूटरवरून जात असताना फटाके फेकले.
...