बहेडी रेल्वे स्थानकाजवळ एका महिलेने स्वतःचा जीव धोक्यात घालून रेल्वेसमोर उभं राहून रील काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बहेडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, महिला रेल्वे ट्रॅकवर उभी होती आणि ट्रेन तिच्या दिशेने वेगाने जात असताना व्हिडिओ बनवत होती. ट्रेन चालकाने लगेच ब्रेक लावला आणि ट्रेन थांबवण्यात यश आले.
...