लखनऊमध्ये चालत्या कारला अचानक आग लागल्याने कार पूर्णपणे जळून खाक झाली. रस्त्याच्या मधोमध ही घटना घडली. कार चालक वेळीच कारमधून बाहेर पडल्याने त्यांचे प्राण वाचले. विकास नगर भागातील रिंगरोड विन पॅलेससमोर कारला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. चालत्या कारमधून धूर निघू लागताच चालक गाडी सोडून बाहेर आला आणि काही वेळातच कारमधून आगीचे लोट निघत होते.
...