पुण्यात थंडीचा कडाका वाढल्याने शहरातील प्राण्यांनाही याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्राने येथील प्राण्यांना उबदार ठेवण्यासाठी व्यवस्था केली आहे. पुण्यातील तापमानात झपाट्याने घट होत असताना, प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी कडाक्याच्या थंडीपासून त्यांच्या प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी सक्रिय पावले उचलली आहेत.
...