कोलकाता येथील एका महिलेचा नुकताच व्हायरल झालेला व्हिडीओ सोशल मीडियावर खळबळ माजवत आहे, ज्यामध्ये ती मेट्रो ट्रेनमधील प्रवाशाशी हिंदीत बोलण्याचा आग्रह करत आहे. हिंदी हा दक्षिणेकडील राज्यांमध्ये विशेषत: कर्नाटकात संवेदनशील विषय बनला आहे. "तुम्ही बांगलादेशात नाही आहात. तुम्ही भारतात आहात. पश्चिम बंगाल हा भारताचा भाग आहे, तुम्ही हिंदी बोलले पाहिजे. भारतात राहून तुम्हाला बंगाली येते, पण हिंदी नाही?" व्हिडिओमध्ये बिगर बंगाली भाषिक महिला म्हणते.दुसऱ्या प्रवाशाने बंगालीमध्ये उत्तर दिले: "मी पश्चिम बंगालमध्ये राहतो, माझ्या गावी, तुमच्या नाही.
...