दिलजीत दोसांझच्या नुकत्याच आयोजित केलेल्या पुणे कॉन्सर्टमध्ये एक खास आणि हृदयस्पर्शी क्षण पाहायला मिळाला. एका चाहत्याने मैत्रिणीला स्टेजवर प्रपोज करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या जोडप्याची प्रेमकहाणी 13 वर्षे जुनी आहे आणि या खास प्रसंगी त्यांच्यातील प्रेम आणि भावना संपूर्ण वातावरणात दिसत होत्या. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असे दाखवण्यात आले आहे की, चाहत्याने स्टेजवर गुडघ्यावर बसून मैत्रिणीला प्रपोज केले, तर पार्श्वभूमीत दिलजीत दोसांझ गाणे म्हणत होता.
...