याआधी 2022 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड हे विधवांशी संबंधित वाईट प्रथांवर बंदी घालणारे देशातील पहिले गाव ठरले आणि महिलांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला, त्यानंतर या मोहिमेला गती मिळाली. हेरवाड गावाने 4 मे 2022 रोजी पतीच्या मृत्यूनंतर पत्नीचे 'मंगळसूत्र' काढणे, कुंकू पुसणे, बांगड्या तोडणे यासारख्या परंपरांवर बंदी घालण्याचा ठराव मंजूर केला.
...