देशाच्या विविध शहरातून दुचाकी चोरून यवतमाळमध्ये विकणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या आरोपींकडून 20 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे. जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. यावेळी एका चोरीच्या तपासात या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला.
...