⚡ठाणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात 24 तास पाणीकपात
By Abdul Kadir
ठाणे शहरातील विविध भागांत 7 मे दुपारी 12 ते 8 मे दुपारी 12 या कालावधीत 24 तासांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. एमआयडीसीकडून जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात करण्यात येणाऱ्या तातडीच्या दुरुस्तीकामामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.