सध्या चीनमध्ये हा विषाणू वेगाने पसरत आहे. लहान मुले आणि वृद्धांना या विषाणूचा सर्वाधिक धोका आहे. चीनमध्ये पसरलेल्या मेटाप्युमोव्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाने (Maharashtra Health Department) नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी (Guidelines For HMPV Virus) केली आहेत. पाच वर्षांपूर्वी चीनमध्ये कोरोना व्हायरचा उद्रेक झाला होता. आता पुन्हा एकदा चीनमध्ये मेटाप्युमोव्हायरसने धुमाकूळ घातला आहे. वाढत्या प्रकरणांना प्रतिसाद म्हणून, भारताची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
...