महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाची एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. ही बैठक दुपारी 12 वाजता मंत्रालयात होणार आहे. या बैठकीत पुण्यातील स्वारगेट बस डेपोच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासोबतच राज्यातील सर्व बस डेपोच्या सुरक्षेचाही आढावा घेतला जाईल.
...