⚡Pune Railway Division: मुंबईतील दुर्घटनेनंतर पुणे रेल्वे विभागाचा धक्कादायक अहवाल; 18 महिन्यांत 158 प्रवासी गाडीतून पडले, 49 जणांचा मृत्यू
By Prashant Joshi
पुणे रेल्वे विभागाने जाहीर केलेल्या अधिकृत माहितीनुसार, जानेवारी 2024 ते जून 2025 या 18 महिन्यांच्या कालावधीत 158 प्रवासी चालत्या गाड्यांमधून पडले. यापैकी 49 जणांचा मृत्यू झाला, तर 109 जणांना गंभीर दुखापत झाली.