नवी मुंबईतील पोद्दार शाळेत नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने शाळेच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत उघडकीस आली आहे. नीलकृष्ण निलेश किन्हीकर असे या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. नववीत शिकणाऱ्या नीलकृष्णने अचानक इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. या घटनेमुळे शाळेत एकच खळबळ उडाली आहे.
...