मित्राच्या हत्येच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. सैफ जाहिद अली असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. काल रात्री सैफ जाहिद अलीचे त्याच्या मित्र छक्कनन अलीसोबत एलबीएस रोड, कुर्ला येथील पॅलेस रेसिडेन्सी बारजवळ एका ऑटोचालकाला २५ रुपये भाडे देण्यावरून भांडण झाले. दोघांमधील हाणामारी इतकी वाढली की, सैफने छक्कनला जोरदार धक्का दिला.
...