दिल्लीनंतर आता देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही वायू प्रदूषणाची चिंता वाढली आहे. मुंबईतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) मंगळवारी मुंबईत GRAP-4 (ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन) लागू केला आहे. एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 200 वर पोहोचल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
...