पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे (पीएचएडीबी) पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए आणि सोलापूर येथील ३ हजार ६६२ सदनिकांसाठी २९ जानेवारी २०२५ रोजी संगणकीय लॉटरी काढण्यात येणार आहे. पुणे जिल्हा परिषद सभागृहात दुपारी एक वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. एकात्मिक गृहनिर्माण लॉटरी व्यवस्थापन प्रणाली (आयएचएलएमएस) २.० च्या माध्यमातून ही लॉटरी ऑनलाइन पद्धतीने काढण्यात येणार आहे, अशी माहिती म्हाडाच्या पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांनी दिली.
...