शनिवारी पहाटे फटाक्यांमुळे (Firecrackers) कळवा, ठाणे येथे कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग (Fire) लागली. तसेच शुक्रवारी रात्री मुंबई शहरात आगीच्या दोन घटना घडल्या. आगीच्या या घटनांमध्ये कोणतीही दुखापत झाली नाही. शुक्रवारी संध्याकाळी 6.30 ते 7 च्या दरम्यान मुंबईतील सायन येथील शिधावाटप कार्यालयात आग लागली.
...