सामान्य कुटुंबांमध्ये चविष्ट आणि किफायतशीर आणि आरोग्यदायी असलेला प्रथिनांचा महत्त्वपूर्ण स्त्रोत असणारी अंडी चांगलीच महागू लागली आहेत. एकट्या मुंबई शहरामध्ये अंड्यांचे दर गगनाला भिडले असून, किरकोळ बाजारात डझनाला 78 ते 90 रुपयांपर्यंत विक्री होत आहे. ही झपाट्याने झालेली दरवाढ मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी चिंता वाढवणारी ठरत आहे.
...