पूजा खेडकरवर नागरी सेवा परीक्षेत फसवणूक केल्याचा आणि बेकायदेशीरपणे ओबीसी आणि अपंगत्व कोट्याच्या लाभांचा दावा केल्याचा आरोप आहे. न्यायमूर्ती चंदर धारी सिंह यांच्या खंडपीठाने 27 नोव्हेंबर 2024 रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. दरम्यान, न्यायालयाने अंतिम निर्णय होईपर्यंत खेडकर यांना दिलेले अंतरिम संरक्षण वाढवले आहे.
...