विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 72 तासांनंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट (President's Rule) लागू होऊ शकते. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे राज्यातील पक्षांना सरकार स्थापन करण्यासाठी केवळ 72 तासांचा कालावधी मिळणार आहे. महायुती किंवा महाविकास आघाडी या एका गटाला स्पष्ट बहुमत मिळाले तरी मुख्यमंत्रिपदावरून एकमत होणे आवश्यक आहे.
...