मुंबई महापालिकेने शाळांचे (BMC Schools Rooms) वर्ग चालविण्यासाठी भाडेतत्वावर घेतलेल्या खोल्या पालिका अधिकाऱ्यांनी संगनमत करुन परस्परच विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बीडीडी चाळ (BDD Chawl) क्रमांक 100 आणि 84 मध्ये हा प्रकार घडला आहे. धक्कादायक म्हणजे शाळांसाठी असलेल्या तब्बल सहा खोल्यांची परस्पर विक्री करुन त्याचे खासगी व्यक्तींकडे हस्तांतरणही करण्यात आले आहे.
...