मध्य रेल्वे प्राधिकरण जुना सायन रेल्वे स्थानक ओव्हर ब्रिज पाडण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या पूलावरील वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. परिणामी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते. ही कोंडी फोडण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी या परिसरातील वाहतूक आज म्हणजेच 8 ऑगस्ट (गुरुवार) पासून तात्पूरत्या स्वरुपात इतरत्र वळवली आहे.
...