⚡नागपूरात ऑडीची पाच वाहनांना धडक, संकेत बावनकुळे यांच्यावर आरोप
By Pooja Chavan
महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याच्या ऑडी कारने ५ वाहनांना धडक दिल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सोमवारी पहाटे अपघात घडला. नागपूरच्या रामदासपेठ परिसरात हा अपघात घडला. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली.