⚡आषाढी एकादशीनिमित्त यंदाही राज्यातील 10 मानाच्या पालख्यांचा होणार एसटी बसमधून प्रवास
By टीम लेटेस्टली
वारी सोहळ्यावर यंदाही कोरोनाचे सावट आहे. हे संकट पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील 10 मानाच्या पालख्यांसाठी एसटीची 'लालपरी' धावणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली.