⚡पुणे-दिघी महामार्गावर ताम्हिणी घाटात वऱ्हाडाची बस उलटली; 5 ठार, 25 हून अधिक जखमी
By Bhakti Aghav
या अपघातात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर 25 हून अधिक जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.