⚡चंद्रपूरमध्ये हत्तीच्या हल्ल्यात 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
By Bhakti Aghav
सिंदेवाही येथील जाटलापूर परिसरात पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. चंद्रपूर जिल्ह्यातील हत्तींच्या हल्ल्याची ही पहिलीच घटना असल्याचे वन अधिकाऱ्याने सांगितले. मारोती मसराम असं मृत वृद्धाचं नाव आहे.