लडाखी वेशभूषेतील हिमबिबट्या, पारंपरिक वाद्य धारण केलेला धोतर-कुर्ता घातलेला 'वाघ' आणि भारतातील विविध प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणारे इतर काही प्राणी-पक्षी आणि त्याच्या विविधतेचे दर्शन घडवणारे इतर काही प्राणी-पक्षी ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलने खास डुडलमध्ये रेखाटले आहेत. या रंगीबेरंगी कलाकृतीत 'गुगल'ची सहा अक्षरे कलात्मकरीत्या थीममध्ये विणली गेली असून, त्यातून 'वाइल्डलाइफ परेड'चे स्वरूप प्राप्त झाले आहे.
...