१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. परंतु, हैदराबादचा निजाम मीर उस्मान अली खान याला हैदराबादला एक वेगळे राष्ट्र बनवायचे होते. हैदराबाद संस्थानामध्ये महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यांचा (मराठवाडा), तसेच आंध्र प्रदेश आणि कर्नाटकाच्या काही भागांचा समावेश होता.
...