शिवरात्रीच्या रात्रीची पूजा आणि अनुष्ठान पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो. या शुभ प्रसंगी महिला पूर्ण शृंगार करून महादेवाच्या दर्शनासाठी जातात. जल अर्पण करतात. या विशेष प्रसंगी महिला शृंगाराचा भाग म्हणून हातावर मेहेंदी लावतात. दरम्यान, या पवित्र दिवशी, आम्ही तुमच्यासाठी काही खास आणि सुंदर मेहेंदी डिझाइन आणले आहेत, ज्यांना तुम्ही हातावर काढून महाशिवरात्री सणाला खास बनवू शकता.
...