भारतात मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा होणाऱ्या शारदीय नवरात्रीला यंदा विशेष महत्त्व आहे. नवरात्रीचा आठवा दिवस, महाअष्टमी म्हणून ओळखला जातो, यावेळी 11 ऑक्टोबर 2024 रोजी साजरा केला जाईल. या दिवशी महागौरी माता, तर नवव्या दिवशी सिद्धिदात्रीची पूजा केली जाईल. यावेळी विशेष बाब म्हणजे महाअष्टमी आणि महानवमीचे व्रत एकाच दिवशी होणार आहे. वैदिक दिनदर्शिकेनुसार, यावर्षी नवरात्रीची सप्तमी तिथी 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:29 वाजता समाप्त होईल, त्यानंतर अष्टमी तिथी सुरू होईल.
...