⚡ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! 18 जून रोजी शहरातील 'या' भागात 12 तास पाणीपुरवठा बंद
By Bhakti Aghav
शहरातील घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवार नगर, कोठारी कंपाउंड, आझाद नगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, आनंद नगर, कासारवडवली आणि ओवळा या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या भागांचा पाणीपुरवठा बुधवार, 18 जून रोजी सकाळी 9:00 ते रात्री 9:00 वाजेपर्यंत बंद राहील.