संशोधकांनी एक विशिष्ट प्रोटीन IL-35 शोधला आहे. हे प्रोटीनमधुमेहावरील उपचारांसाठी नवा पर्याय असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. हे प्रोटीन जळजळ निर्माण करणारी रसायने तयार करणाऱ्या पेशी कमी करतात. यामुळे स्वादुपिंडाच्या पेशींचा प्रभाव कमी होतो. ही प्रक्रिया टाइप 1 मधुमेह आणि स्वयंप्रतिकार मधुमेह मेल्तिसमध्ये सकारात्मक आणि महत्त्वपूर्ण योगदान देते. केंद्र सरकारच्या इन्स्टिट्यूट फॉर ॲडव्हान्स्ड स्टडी इन सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी हा शोध लावला आहे.
...