कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यामुळे उत्तर भारतातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तर भारतातील अनेक भागात पुढील दोन-तीन दिवस दाट धुक्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ६ ते ८ जानेवारी दरम्यान पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता आहे. तर बिहार, आसाम, मेघालय, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा आणि मणिपूरमध्येही 6 जानेवारीला दाट धुके पडण्याची शक्यता आहे.
...