देशातील अनेक राज्यांमध्ये पुढील काही दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 11 सप्टेंबरच्या रात्री सॅटेलाईट इमेजेसमध्ये दिसणारी डिप्रेशन सिस्टीम मोठ्या प्रमाणात उत्तर भारताच्या भागात दाखल झाली आहे. हवामान खात्याने चेतावणी जारी केली आहे की, पुढील ४८ तासांत पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये अत्यंत मुसळधार (१५०-३५० मिमी) पाऊस पडू शकतो.
...