उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे. पाऊस आणि बर्फवृष्टीनंतर संपूर्ण परिसरात थंडीचा प्रभाव अधिक वाढत आहे. मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे कडाक्याच्या थंडीत लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाब, राजस्थान आणि बिहारमध्ये थंडीची लाट कायम आहे. डोंगराळ भागात बर्फवृष्टी आणि मैदानी भागात दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
...