लखनऊच्या चौधरी चरणसिंग विमानतळावर मालवाहू स्कॅनिंगदरम्यान एका पेटीत नवजात बाळाचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर विमानतळावर एकच खळबळ उडाली आहे. सकाळी मालवाहू सामानाच्या स्कॅनिंगदरम्यान नवजात बाळाचा मृतदेह सापडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने विमानतळ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
...