रील बनवण्याच्या नादामुळे अनेक लोक आपला जीवही धोक्यात घालत आहेत. गाझीपूरमध्ये एक घटना उघडकीस आली आहे, ज्यामध्ये कुटुंबातील एक सदस्य रील बनवण्यात व्यस्त असताना त्यांच्या समोरील एका चार वर्षांच्या निष्पाप मुलीचा नदीत बुडून मृत्यू झाला. गाझीपूरच्या सैदपूर नगरमध्ये गंगा नदीच्या काँक्रीट घाटावर हा हृदयद्रावक अपघात झाला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
...