देशातील महान उद्योगपती आणि टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांना वयोमानाच्या समस्येमुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे बुधवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने देशातील दिग्गज व्यक्तींपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनी शोक व्यक्त केला आहे.
...