कोलकाता उच्च न्यायालयाने गुरुवारी तृणमूल काँग्रेसचे आमदार माणिक भट्टाचार्य यांना जामीन मंजूर केला. पश्चिम बंगालमधील कोट्यवधी रुपयांच्या शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) भट्टाचार्य यांना अटक केली होती. न्यायमूर्ती शुभ्रा घोष यांनी भट्टाचार्य यांना त्यांचा पासपोर्ट ट्रायल कोर्टात जमा करावा लागेल आणि तपास अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय ते शहर सोडू शकत नाहीत या अटीवर त्यांना जामीन मंजूर केला.
...