तामिळनाडूतील राणीपेट येथे गुरुवारी ट्रक आणि बसची भीषण धडक झाली. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंजुनाथ, कृष्णप्पा, शंकरन आणि सोमशेखरन अशी मृतांची नावे आहेत, अशी माहिती राणीपेट पोलिसांनी दिली. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
...