तुर्कस्तानच्या वायव्य ेकडील बोलू प्रांतातील कार्तलकाया स्की रिसॉर्ट हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत मृतांचा आकडा ७६ वर पोहोचला आहे. या प्रकरणी नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. गृहमंत्री अली येरलिकाया यांनी ही माहिती दिली. देशात बुधवारी राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे. शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी घटनास्थळी प्रसारमाध्यमांशी बोलताना येर्लिकाया यांनी शोध आणि बचाव कार्य पूर्ण झाल्याची पुष्टी केली.
...