कोलकात्यातील मृत डॉक्टर रेप आणि हत्या प्रकरणी तिला न्याय मिळावा या मागणीसाठी डॉक्टर आंदोलन तीव्र करत आहेत. आज ते शहरातील विविध दुर्गापूजा मंडपात पत्रिकांचे वाटप करणार असून रक्तदान शिबिराचेही आयोजन करणार आहेत. कनिष्ठ डॉक्टर देबाशीष हलदर म्हणाले की, जेव्हा आरजी कार हॉस्पिटलच्या ५० हून अधिक वरिष्ठ डॉक्टरांनी त्यांच्या समर्थनार्थ सामूहिक राजीनामा दिला तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढला.
...