उद्योगपती रतन टाटा यांच्या पार्थिवावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, टाटांचे पार्थिव गुरुवारी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत एनसीपीए येथे जनतेच्या श्रद्धांजलीसाठी ठेवण्यात येणार आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एमेरिटस रतन टाटा यांचे बुधवारी संध्याकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले.
...