india

⚡झारखंडच्या रामगडमध्ये भीषण अपघात, चार जण ठार, आठ जखमी

By Shreya Varke

झारखंडमधील रामगड जिल्ह्यात बुधवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात तीन शाळकरी मुलांसह चौघांचा मृत्यू झाला, तर सात ते आठ जण जखमी झाले. जखमी मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि प्रशासनाचे अनेक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. गोला येथील गुडविल मिशन स्कूलची मुले रिक्षाने शाळेत जात असल्याचे सांगण्यात आले. गोला पोलिस ठाण्याच्या तिर्ला चौकाजवळ बटाट्याने भरलेला ट्रक रिक्षावर उलटला. रिक्षातील मुले ट्रकखाली गेली.

...

Read Full Story