प्रयागराजमधील कराचना येथे एका नवविवाहित महिलेने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अनपेक्षित घडामोडींमुळे नवरदेवाने तिला तिच्या आई-वडिलांच्या घरी परत पाठवले. 24 फेब्रुवारीला हा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी वधूने पोटात तीव्र वेदना होत असल्याची तक्रार केली. संबंधित कुटुंबियांनी तिला सीएचसी कराचना येथे दाखल केले, जिथे डॉक्टरांनी ती नऊ महिन्यांची गर्भवती असल्याचे आणि प्रसूती करावी लागणार असल्याचे सांगितले.
...