सीपीआय(एम) (CPI(M)) चे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यसभा खासदार सीताराम येचुरी (Sitaram Yechury Passes Away) यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी (12 सप्टेंबर) निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. येचुरी यांच्यावर दिल्लीच्या एम्समध्ये (AIIMS Delhi) उपचार सुरू होते. श्वसनमार्गाच्या तीव्र संसर्गामुळे त्यांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आले होते.
...