पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवार 17 सप्टेंबर रोजी त्यांचा 74 वा वाढदिवस साजरा करत आहेत. या खास प्रसंगी त्यांना देशभरातील ज्येष्ठ नेत्यांकडून अभिनंदनाचे संदेश येत आहेत. केवळ भारतातूनच नाही तर परदेशातूनही पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील वडनगर येथे झाला होता. सलग तीन वेळा पंतप्रधान म्हणून निवडून आलेले मोदी हे भारताचे दुसरे पंतप्रधान आहेत.
...