कोविड महामारीदरम्यान काम करण्याच्या पद्धतीत लक्षणीय बदल झाले आहेत. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे वर्क फ्रॉम होमसारख्या सुविधा अधिक सुलभ झाल्या आहेत. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी महिलांसाठी 'वर्क फ्रॉम होम'ची घोषणा केली आहे. 8 मार्च रोजी येणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेश सरकारने राज्यातील नोकरदार महिलांना खास भेट दिली आहे.
...